मीच मला सापडले नव्याने


    

        नदीतील  पाणी आटाव अन कालांतराने पात्र सुकून किनाऱ्याशी एकरूप व्हावं,असंच काहीसं सुलभासोबत घडलं होतं तिच्या डोळयातील पाणी आटायला मात्र सात वर्षे लोटली होती विस्कळीत झालेली आर्थिक स्थिती काहीशी  सुधारत होती .दोन मुली अन एक मुलगा शिक्षण घेत होते तिघेही भावंड अभ्यासू होती .काटकसर करुन ही चारही जीव आनंदात होती .

रूपवान असूनही ती स्वतःला आरश्यात न्याहाळायचं विसरून गेली होती,आणि पहावं तरी काय पांढरं कपाळ ! फिक्या रंगाची साधी साडी डोक्यावर पदर पायात प्लास्टिकच्या चपला हीच तिची राहणीमान होती. नवरा अपघातात गेल्यानंतर तिने दुःखाला पाठ देऊन खंबीरपणे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविला होता  परिसरात तिच्याकडे  आदराने पाहिले जातं असत, अपवाद काही वासनेने बरबटलेल्या आंबटशौकिनांच्या नजरा मात्र तिला छळीत असत तसा ती न ढळलेला पदर आणखीन सावरून घेई तश्या ह्या नजरा तिला नव्या नव्हत्या पण विधवा झाल्या पासून तीच मन घायाळ होई परंतु तिची शुन्यात असलेली नजर कुणालाही गाठता येत नसत . 
तिला आपल्या शरीराची अतृप्त भुक जाणवत नव्हती असे नाही नवऱ्याच्या गोड आठवनींत ती हरवून जात असे ती आजही त्याच्याशी एकनिष्ठ होती.

आणि….एकदा भलतंच घडलं त्याची तिची नजरानजर, काही कळायच्या आत ती त्याच्या बाहुपाशात, तो हवा हवासा स्पर्श ,चुंबनाचा वर्षांव, नग्न शरीरं ,उत्कटता कधीही सरू नये असा सहवास .ती परिपुर्ण झाल्याचा आंनद उपभोगत असतानाच तिचे डोळे उघडले गेले  ती त्याला आजूबाजूला पाहु लागली  शरीर ओलचिंब झालेलं हृदयाची धडधड कमी होऊ लागली ,तशी ती भानावर आली आपल्याशी सहवास केलेला नवरा खुप आधीच सोडून गेला याची तिला जाणीव झाली पाणावलेले डोळे पुसले.तशी पहाट झालीच होती . 

मुलांचं आवरून ती कामावर आली परंतु आज ती उदास नव्हती परिपुर्ण झाल्याच्या समाधानात होती. दिवसभर तिला ते स्वप्न सुखावत होतं कित्येक वर्षानंतर तिच्या शरीराची तृप्तता झाली होती.  
आज पुन्हा तेच स्वप्न पडावं आणि तिला तृप्त करावं असा विचार करीत ती झोपी गेली, पण ते स्वप्न काही पुन्हा कधीच पडले नाही. स्वप्नात मिळालेली तृप्तता तिला हवी हवीशी वाटू लागली. आपला नवरा प्रत्यक्षात कधीच येणार नाही याची तिला जाणीव होती ती बैचैन राहू लागली, तिला आता त्या स्वप्नाचा तिटकारा वाटू लागला कारण त्यामुळेच शरीरसुखाची उत्कंठा शिगेला पोहचली होती ती कित्येक वर्षे एखाद्या साध्वी सारखी जगली होती पण आता काय करावे तिला काही सुचत नव्हते . 

अचानक एकदा तिला लोकलमध्ये स्मिता भेटली शनिवार असल्याने तिचा हाफ डे होता  एकाच परिसरात राहूनही  कित्येक दिवस भेट नव्हती दोघीही एकमेकींची आपुलकीने विचारपूस करीत होत्या ती सुद्धा एक विधवा होती.  काळीसावळी पण देखणी आकर्षक बांधा बँकेत क्लार्क होती ती भारी भरजरी साड्या नेसत पदर मात्र खांद्यावर व कपाळावर चॉकलेटी टिकली लावीत तशी ती बिधास्त होती . 

वीज चमकावी तशी सुलभाच्या मनात विचार आला स्मिता तर माझ्या खूप आधी विधवा झालीय, मग आपल्याला जो मानसिक आणि शारीरिक त्रास होतोय असाच हिला होत असेल का ? इतक्यात स्टेशन आले दोघी उतरून घराच्या दिशेने चालू लागल्या . 
स्मिता, मला तुला काही विचारायचे आहे 
विचारना .. 
थोडसं खाजगी आहे 
तिचा गोंधळ पाहून स्मिता म्हणाली  चल आपण चहा घेऊ. 
दुपारच्या जेवणाची  वेळ निघून गेल्याने हॉटेलात शांतता होती . 
आता बोल काय विचारायचय , इथे कोणी नाहीये 
म्हणजे तू हि एक विधवा आहेस तुला..... कधी शरीरसुखाची इच्छा वाटते कि नाही ? अगदी घाईघाईने तिने प्रश्न पूर्ण केला . 
स्मिता गालातल्या गालात उगाचच हसली . का ? मी माणूस नाही का ? अग हे नैसर्गिक आहे प्रत्येक सजीवाची ती गरज असते . 
हो ! पण ..  आपण तर विधवा आहोत ना ? आपली  गरज कशी  पूर्ण होणार ?  
दुसरे लग्न करून अथवा अनैतिक संबंध ठेऊन माझे आहेत संबंध एका व्यक्तीसोबत . 
काय ??  ती ऐकूनच अचंभित झाली होती 
चपापलीस ना ? सत्य नेहमी कडू असत ग . 
एखादा पुरुष विदुर झाला तर तो  पुन्हा दुसरे लग्न करतो त्याला एखादी कुमारिकाही मिळते अथवा तो अनैतिक संबंध हि ठेवू शकतो  पण त्यांना समाजाकडून सहानुभूती मिळते . 
याउलट विधवेशी लग्न करायला सहसा कुणीही धजावत नाही त्यांना अपशकुनी समजलं जातं.  ज्यांना चांगली नोकरी नसते किंवा वयस्कर असतात त्यांना  कुमारिका मिळणे  शक्य नसते  असे विदुर अथवा घटस्फोटित तयार होतात,  पण  त्यांनाही मूल नसलेली स्त्री हवी असते.  त्यांना स्वतःला जर आधीची अपत्ये असतील तरच एखादं मुलं असलेली विधवा स्वीकारली जाते एक पेक्षा जास्त मुले असलेली विधवा कोण स्वीकारतो !

तुझ्या माझ्या सारख्या असंख्य विधवा काबाडकष्ट करून मुलांचं संगोपन करतात त्यांना बापाच्या प्रेमाची उणीव भासू देत नाहीत त्यांच्याकडे पाहून आपण आपले जीवन कंठीत असतो पण ,आपल्या  वैयक्तिक सुखाच काय ? आपल्याला भोगायला सार जग तयार असत पण स्वीकारायला नाही ! मग आपणही कधी स्वतःसाठी जगलो तर काय बिघडतं ? माझे संबंध आहे म्हंटल्यावर तुला हि धक्का बसला ना ?
नाही तस.. नाही पण ह्या गोष्टी कुणाला समजल्यावर समाजात प्रतिष्ठा राहील ?
कुठल्या जगात जगतेस सुलभा, अग समाजाच्या रूढी परंपरेनुसार पांढरं कपाळ डोक्यावर पदर साधी राहणी यामुळेच हे संस्कृति रक्षक तुझा आदर करतात यापैकी कित्येकांना तू आजपर्यंत पवित्र राहिलिस यावर विश्वास नसणार ह्या घाणेरड्या संस्कृतित विधवा हि बदनामच असते . 
सुलभाचे डोळे भरून आले पण तिने आपले अश्रू डोळ्याबाहेर येऊ दिले नाही .खरं आहे परंतु आपल्या वैयक्तिक सुखासाठी परपुरुषाशी मैत्री आणि ...... मला नाही जमणार हे . 
तू सात आठ वर्ष ह्या सुखापासून वंचित आहेस तुला हि सुखी होण्याचा अधिकार आहे ग,  काळजी करू नकोस माझ्या मित्राला सांगून त्याचा एखादा मित्र तयार करू . 
नाही स्मिता नको मला भीती वाटते क्षणभर शून्यात पाहून... उद्या माझ्या मुलांना नातेवाईकांना समजल्यावर काय राहील ? नको नको मला नको असलं सुख . 
सुनील माझा मित्र जिथे राहतो त्या ठिकाणी तुला कुणीही ओळखणार नाही तशी आम्ही काळजी घेऊ पण तुला हे सुख मिळायलाच हवं . 

स्मिताचा प्रस्ताव तिला मान्य नव्हता तरी त्या रात्री सुलभा झोपू शकली नाही तिच्या डोक्यात विचारांचं काहूर माजल होतं. आपल्याकडे वासनांधतेने बघणारे जास्त वाईट कि परंपरेनुसार विधवेचं जीवन जगतो म्हणून आदर करणारे संस्कृति रक्षक जास्त वाईट कि त्यांच्यातीलच संशयाने बघणारे जास्त वाईट  ?

तिची कोणी साधी विचारपूस  केली तरी तिला ती फसवी वाटू लागली . तिला तिच्या विधवापणाचा तिरस्कार वाटू लागला.  स्वभावाने अधिक गंभीर होऊ लागली प्रत्येकाला सुखी आनंदी राहण्याचा अधिकार आहे मग विधवेसोबत असा दुजाभाव ! रूढीपरंपरा आणि ह्या घाणेरड्या संस्कृतीचा तिला तिटकारा वाटू लागला होता . 
मुलांसोबत गप्पा मारताना मात्र ती रमत असे मायलेकरांचे प्रेम देखावा नव्हता हाच एकमेव धागा तिला जिवंत ठेवण्यास पुरेसा होता . 

मावशी तुला आईने बोलावलंय .दारात स्मिताची मुलगी होती 
अग येना..  आत, जेवायला बस . 
नको .. माझे जेवण झालय येते मी . आणि ती बाहेरूनच निघून गेली.  
अग आहेस कुठे ? स्मिताने दारातच सुलभाला प्रश्न केला 
कुठे जाणार ! कामाहून आल्यावर मुलांमध्ये मन रमतं ग ..
काय विचार केलास ?
सुलभाने चमकून स्मिताच्या मुलीकडे  पाहिलं ती थोडी दूर अभ्यासात मग्न होती . नाही स्मिता मला नाही जमणार तू नको उगाचच टेंशन घेऊस. 
मी टेंशन कधीच घेत नाही स्वतःकडे बघ हफ्त्यात चेहरा कसा सुकलाय ,डोळ्याखाली वर्तुळं दिसायला लागलीत असं झुरुन मरु नकोस ग . हे जीवन पुन्हा नाही जीवनातील आनंद उपभोग तो प्रत्येक मानवाचा अधिकार आहे 
कधीतरी स्वतःसाठी जगून बघ .
पण ..
स्मिताने तिला मध्येच थांबवत, हे बघ तू काळजी करू नकोस सुनीलच्या परिचयाचा एक युवक आहे बायको गावी असल्याने त्यालाही एकटेपणा सतावतोय आणि त्याला वेश्यालयात जायला आवडत नाही म्हणजे हा चांगला असावा 
मला दुसरं काही ऐकायचं नाही उद्या संडे आहे तू माझ्या घरी ये दुपारी तीन नंतर निघू आपण .
बघते म्हणत सुलभा घरी आली. 
 
स्मिताने तिच्या मनातील विझलेली आग पुन्हा सुलगवली होती मनातील  एक कोपरा सुखावला होता परंतु बुद्धीला काही पटत नव्हतं.अंथरुणावर पडली परंतु तिच्या मनातील द्वंदव काही संपत नव्हतं,अखेर तिच्या मनाचा विजय झाला. संस्कृति रक्षकांच्या समाधानासाठी मी का आपल्या सुखाचं बलिदान द्यावं ? मला हि सुखी राहण्याचा हक्क आहेच ना ! अखेर मी सुद्धा एक माणूसंच आहे ना !
उद्या भेटणार तो कसा असेल ? आणि काय ? कस ? असे बरेच प्रश्न तिच्या मनात येऊ लागले . 
तिला तिची पहिली रात्र आठवली, नवऱ्याने केलेली तिच्या सौदर्याची  स्तुती ती प्रेमळ नजर तो आदर ते पहिल चुंबन तो पहिला  स्पर्श पहिल्यांदाच झालेलं समागम तो परमोच्च क्षण ती तृप्ती अशा कित्येक रात्री तिने भोगलेल्या आठवून ती गोरीमोरी झाली . 
उद्या भेटणारा तो कसा असेल ? उत्सुकता होती तशी भीतीही वाटत होती पण तिने हे अजब धाडस करायचं ठरवलं होते .
 
कामावर जाताना जसा शृंगार असे तसाच तिने आजही केला होता  व स्मिता कडे गेली तिची अजून तयारी चालू होती तिने अत्तराची बाटली सुलभावर उडवली तसे ती नको म्हणाली पण स्मिताने ऐकले नाही ,
अग अत्तरामुळे घामाच्या दुर्गंधीचा वास येत नाही म्हणून लावतात 
अर्ध्या तासाच्या प्रवासानंतर टॅक्सी एका बस स्टॉप जवळ थांबली तिथेच एक युवक त्यांची वाट पाहत उभा होता सुलभाला पाहून तो तिच्याकडे अधाश्यासारखा पाहू लागला . 
स्मिता ने ओळख करून दिली हि माझी मैत्रीण सुलभा . 
नमस्कार, मी सुनील . 
सुलभाने हि स्मित करत नमस्कार केला . 

थोडे अंतर चालून ते एका वस्तीत  शिरले अर्धवट भिंती व पत्र्यांच्या  कुडाची उभी आडवी झोपडी वजा घरं गर्दी करून होती रस्त्यात वर्दळ कमी होती कुणी कुणाकडे पाहत हि नव्हतं जो तो आपल्यात मश्गुल असल्यासारखा वाटत होता पुढे एका वळणावर ते वळले तिथेच झाडाखाली काही मंडळी पत्ते  कुटीत होती त्या सर्वांनी मात्र माना फिरवून पाहिलं त्यातूनच एक युवक पुढे आला सावळा मध्यम बांध्याचा तुरळक  दाढी वाढलेली अंगात कॉटनचा शर्ट आणि लुंगी लावलेली साधारण तिशीतील असावा त्याने सुनीलशी हस्तांदोलन केले आणि काहीही न बोलता बाजूलाच असलेल्या आपल्या घरात घेऊन गेला सोबत असलेल्या ह्या महिलांकाकडे  पाहून न पाहिल्यासारखे करीत होता. 
घरात एक जुना सागाचा मोठा पलंग होता एका बाजूला स्टोव्ह आणि गरजेपुर्ती भांडीकुंडी होती कोपऱ्यात मोरी आणि दरवाज्याच्या बाजूला मोठा देव्हारा होता त्यात दिवा जळत होता . 
मी चहा मागवतो !
सुनील उठला.  त्याच्या खांद्यावर हात ठेवून, नको..  उशीर होईल चल येतो आम्हीं थोड्या वेळात . तशी स्मिताही उठली . 
एव्हाना सुलभाने तिचा हात घट्ट धरून ठेवलेला होता तीचा थरकाप जाणवत होता तरीही स्मिताने  दुसऱ्या हाताने हात सोडवत, जवळच आहे मी, येईन थोड्या वेळात..  म्हणत  दोघेही निघून गेले . 

दाराची कडी लावून तो वळला ,सुलभा मान खाली घालून थरथरत उभी होती तो जवळ आला , तिचा पदर हिसक्याने खेचून  अगदी फिल्मी स्टाईलने काही कळायच्या आत तिची साडी फेडली तिने दोन्ही हाताने आपली छाती झाकून घेतली तिची उघडी  नाभी पाहून तो अधिकच चेकाळला तिचे दोन्ही हात पिरगळून छातीहून बाजूला सारत त्याने तिला अमानुषपणे पलंगावर ढकलली  ती जोरात पाठीवर कोसळली सार अनपेक्षित होते तिने त्याच्याकडे पाहिल तर तो घाई घाईने त्याचे कपडे काढीत होता तिने आपले डोळे घट्ट लावून घेतले पुढच्या काही क्षणांत तो तिच्यावर तुटून पडला एखाद नाजूक फुल कुस्करून टाकावं तसा  तो जनावराप्रमाणे तिला ओरबाडीत होता तीच अंग न अंग ठणकू लागले ती कशी तरी त्याला बस्स..  म्हणाली तोच,
त्याने तिच्या थोबाडीत मारली.  " रांड साली तुलाच खाज होती ना ? तुझ्यासाठी सेक्स पावरची गोळी घेतलीय मी  चॉप एकदम" आणि अधिक त्वेषाने तिला ओरबाडू लागला तिला मेल्याहून मेल्यासारखे झालं शरीराला होणाऱ्या  वेदनेपेक्षाही त्याने दिलेली शिवी तिच्या जिव्हारी लागली होती .

तिला अपेक्षा होती ती प्रेमपूर्ण समागमाची त्यातून मिळणाऱ्या तृप्तीची पण प्रत्यक्षात तिच्यावर पाशवी बलात्कार होत  होता. 

काही वेळाने तो शांत झाला पण तिच्यावरील राग अजून तसाच होता तिची खाज मिटवून तिच्यावर उपकार केल्याचा भाव त्याच्या चेहऱ्यावर स्प्ष्टपणे दिसत होता, त्याने लुंगी लावली आणि काही तरी आठवल्यासारखे चटकन बाहेर निघून गेला सुलभा तिचे कपडे सावरू लागली तोच,

दुसरा एक इसम आत आला " मला पण पाहिजे, बघ कशी  खुश करतो तुला " म्हणत जबरदस्ती करू लागला सुलभा हात जोडून गयावया करीत होती . 

बाहेर स्मिता नुकतीच आली सुलभा सोबत असलेला युवक एकटाच दारात उभा पाहून सुलभाला विचारले  तो गोंधळला , तो काही उत्तर देण्याधीच तिने दाराला बाहेरून कडी पाहिली तिने ताबडतोब कडी काढून आत प्रवेश केला सुलभा चे हात जोडून गयावया करणारे रूप पाहुन तिचा संताप झाला तिने पायातील चप्पल काढली आणि त्या इसमाला बडवायला सुरुवात केली तो कसातरी पळाला. 
 
तिने सुलभाला छातीशी कवटाळले तशी ती ओकसाबोक्क्षी रडू लागली स्मितालाही भरून आले पण तिने तसे न दाखवता तिला धीर देत शांत करीत होती स्मिताला खुप पश्चाताप होत होता.  तिचा चेहराही तिनेच धुतला केस नीटनेटके केले आणि साडी नेसवु लागली तोच सुनील आत आला.  
बाहेर निघ..  तो जायला लागला तशी ती हि बाहेर आली तो भडवा कुठे आहे ? म्हणत आजूबाजूला पाहू लागली झाडाखालील पत्ते कुटणारी मंडळी हि गायब होती . 
असेल इथेच कुठे तरी .
तुला त्याची लायकी माहिती  होती  ना ?  
अग..  म्हणजे मला .. 
एक शब्ददेखील बोलू नकोस तू हि चालता हो, पुन्हा माझ्यासमोर कधीही येऊ नकोस. 
तिचा अवतार पाहून सुनील ताबडतोब निघाला. 

आत येऊन सुलभाला घेऊन ती निघाली वाटेतच त्यांना टॅक्सी मिळाली सुलभाचे डोळे सारखे भरून येत होते 
सुलभा सावर स्वतःला, मला माफ कर ग मला खरोखर खूप पश्चाताप होतोय . 
सुलभा काहीही बोलत नव्हती  डोळे मिटून टेकली तशी तिला झोप लागली अर्ध्या तासात परिसर जवळ येताच स्मिताने सुलभाला हलवले तशी ती दचकली .  
सुलभाला तिने आपल्याच घरी नेले तिची मुलगी घरात नसल्याने स्वतः गरमागरम कॉफी करून दिली . 

विधवा म्हणजे सहज उबलब्ध होणारी, वासनेने वखवखलेली, निराधार अशी खैरात असच काहीसं समजलं जात असाव ना ! इतका वेळ शांत असलेली सुलभा सहज बोलून गेली.
 
हो अगदी खरं आहे विधवा म्हणजे वासनेने पेटलेली आग आणि ती आग विझवणं म्हणजे खरी मर्दानगी असं मानणारी हि नराधमं . खर तर ते त्यांची स्वतःची विकृत वासना पूर्ण करीत असतात . 

मुलगा ७ वर्षाचा असताना मी विधवा झाली होती आईने माहेरात आसरा दिला पण शुभ कार्यात मला जाणीवपुर्वक टाळलं जातं . अपशकुनि म्हणून कुणी तोंड फिरवत, घरात भावजयीला अडसर वाटत होता . ज्यांना सज्जन समजत होती त्यांच्या हपापलेल्या नजरा पाहून घुसमट होत होती . जिथे लहानाची मोठी झाली तिथेच असुरक्षित वाटत होते  
दोन वर्षानंतर बँकेत नोकरी लागली पांढर कपाळ पाहून प्रवासात बँकेत ह्या नराधमांचा त्रास जाणवत होता  बँकेत काही कश्टमर इशारे करीत, डबल मिनिंग ने बोलत, देवाणघेवाण करताना  काही हरामखोर हाताला स्पर्श करीत 
एक वयस्कर विधवा शिपाई मावशी होत्या त्यांचा आधार वाटायचा त्या नेहमी सांगत खंबीर हो घाबरलीस तर हे असेच डिवचत राहतील पुढे त्यांनीच मला टिकली लावण्यास भाग पाडले अनोळखी लोकांचा त्रास कमी झाला मला थोडं मोकळं वाटत होते पण चार वर्षांनंतर माझ्यात झालेला बदल माझ्या भावाला रुचला नाही तो आईला टोचू लागला त्याची इज्जत जात होती म्हणे माझ्या कोवळ्या मुलांसमोर ह्या चर्चा होत होत्या . 

मी माझ्या घरी निघून आले.  एकदा  माझ्या मुलाने प्रश्न विचारला तुला कशाला हव्यात कलरफुल साड्या ? मी त्याला सांगितले अरे सोबत असलेल्या सहकाऱ्यांनी आपला  गबाळा अवतार पाहून कमी लेखू नये म्हणून नीटनेटके राहणे चांगल्या साड्या  नेसणे गुन्हा आहे का ? त्यावर तो म्हणाला अग  पण तु एक विधवा आहेस ! त्याचे शब्द माझं काळीज चिरत गेले. सांगतानाही  स्मिताच्या डोळ्यात पाणी तरळत होत तसे सुलभाचेही डोळे भरून आले होते .

विधवेने चांगल्या साड्या  नेसणे नीटनेटकं राहणे म्हणजे ती वासनांध झाली असं मानणारा हा समाज, माझा भाऊ आणि मुलगाही ह्या संस्कृति रक्षकांचेच प्रतिनिधी आहेत.  
शारीरिक सुखासाठी मी सुनीलकडे आकर्षित झाले नाही माझा नित्याचा विरोध म्हणून त्याने मला लग्नाची मागणी घातली मला ते शक्य नव्हतं पण मला तो खूप उदार वाटू लागला मला मानसिक आधार हवा होता पण तो  माझ्या भावनांशी खेळता खेळता  शरीराशी खेळू लागला त्याची विकृत वासना मला कधीच सुख देऊ शकली नाही रक्ताची नाती दुरावल्याने मला त्याचा आधार वाटत होता बस्स,पण तो मात्र त्याची विकृत वासना  पूर्ण करता करता आपली चैन ही भागवू लागला ह्यां त्या कारणाने पैसे उकळू लागला . 

सुलभा उदासपणे गालातच हसली तू माहेर सोडलस संस्कृति रक्षकांविरुद्ध बंड केलंस पण ज्या नराधमांचा तुला विट आला होता अशाच नराधामाकडून फसलीस ना ! खरंतर तू स्वतःला फसवत होतीस.

खरं आहे तुझं म्हणणं , पण ही फसगत फार पूर्वी पासून चालू आहे आईवडिलांच्या समोर विधवेला  सती जावे लागे पण कुणीही ब्र काढीत नसत यासाठी इंग्रजांना कायदे करावे लागले बालपणात झालेली विधवा तारुण्यात जवळच्याच नातेवाईकांकडून नासवली जात मग तिलाआत्महत्येशिवाय पर्याय नसे ज्योतिबा फुलें सारख्या थोर सुधारक नव्हे क्रांतिकारकाने विधवांसाठी आश्रम काढून आसरा दिला, त्यानंतर महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात स्त्रियांनाही मूलभूत हक्क दिले पण आज स्वातंत्र्याला 35 वर्षे उलटली तरीही समाजाच्या मानसिकतेत बदल  झाला नाही . 
पूर्वी च्या विधवा ह्या परंपरांना धरून राहत संस्कृती ला जपत त्याला कारण त्या कुणावर तरी अवलंबून असतं .  समाजाने घालून दिलेल्या रुढीपरंपरेनूसार त्या  आपलं विधवापन जाळीत असतं  त्यांना  निर्णयस्वातंत्र्य नव्हतं . 

आजची स्त्री स्वतः कमावते तिने कसे राहावे हा अधिकार तिला संविधानाने दिला आहे  तरीही स्वतःला  पुरोगामी समजणारे समानतेच्या गोष्टी करणारे विधवेला तो सन्मान देत नाहीत अपवाद काही बोटावर मोजण्याइतके असतात जे रुढीपरंपरेला झुगारुन आपल्या विधवा आई बहिणींना शुभकार्यात ही समानतेची वागणूक देतात व अशीच लोकं इतर विधवांकडे सुद्धा सन्मानाने पाहतात !

स्मिता..  मी हि टिकली लावणार आणि आवडत्या रंगीत साड्या हि वापरणार काही ठराविक लोकांना चांगल वाटावं म्हणून मी का परंपरेची गुलामी पत्करावी ? मला नको आहे ह्या संस्कृतीरक्षकांची सहानुभूती आणि त्यांनी दिलेल सर्टिफिकेट. पांढरं कपाळ मिरवताना काय घुसमट होते ते  फक्त एखादी विधवाच जाणू शकते.
 
खूप छान निर्णय घेतलास सुलभा आता अनोळखी लोकांचा त्रास होणार नाही खूप मोकळे वाटेल तुला . 

एवढेच नाही मला पुन्हा शारीरिक गरज हि वाटणार नाही एखाद्या अपघातात एखाद्याचा हात किंवा पाय जातो तरीही ती व्यक्ती त्याशिवाय  जगतेच ना ,मग आजच्या अपघातात मी हि माझ्या शरीराचा एक भाग गमावला आहे असेच समजेन , कारण ह्याच मार्गातून माझ्या मनाला भयंकर वेदना झाल्या आहेत .मला स्वतःला फसवून जगायचं नाही तर मला स्वाभिमानाने आणि ताठ मानेने जगायचंय . 

सुलभा तू खरंच ग्रेट आहेस, माझी प्रेरणा ठरलीस, मला हि तुझ्यासारखच जगायला आवडेल . 

सुलभा घरी जायला निघाली  तशी स्मिताने तिला कडकडून मिठी मारली पण आता  त्या रडल्या नाहीत . 

टिकलीचे पाकीट घेऊन सुलभा घरी गेली.  तिला पाहून मुलं खुश झाली मोठया मुलीने आईच्या हातातील टिकलीचे पाकीट पाहून  पटकन हातात घेतले आणि गंभीर झाली . 
आई तू टिकली लावणार ? कुठून आणलस हे ? ती डोळे विस्फारून बोलत होती 
कोपऱ्याच्या दुकानातून . 
तशी ते पाकीट घेऊन ती बाहेर पडली . 

सुलभाला हंबरडा फोडून रडावसं वाटत होत. तिला स्मिताचा मुलगा आठवला, पण तो तर पुरुष आहे आणि माझी लेक एक स्त्री असून असे विचार ? तिला जगण्याची उमेद संपल्यासारखी वाटू लागली भरलेले डोळे कुणी पाहू नये म्हणून पटकन  मोरीत शिरली थंड पाणी अंगावर घेऊन घाणेरडे स्पर्श धुऊ पाहत होती तोच मुलीने आवाज दिला .
 
आई..  एवढ्या घाईत अंघोळ करायला गेलीस ? अग पाणी तरी तापवू द्यायचं होत . 

तिचा मृदु स्वर ऐकून सुलभाला आश्चर्य वाटले.  काही वेळाने केस सुकवत ती बाहेर आली . 
डोळे मीट !
सुलभाला मुलीचं असं अनपेक्षित वागणं समजत नव्हत तिचा चेहराही प्रसन्न वाटत होता.  तिने नाईलाजाने डोळे मिटले. त्याच अवस्थेत तिला आरशासमोर उभी करून तिच्या कपाळावर टिकली लावल्याचं तिला कळलं, तसे तिने डोळे उघडले.  
मुले टाळ्या वाजवत होती तिने पाहिले तिच्या कपाळावर ती पूर्वी लावीत तशीच लाल रंगाची टिकली होती. 

अग हे काय लाल रंगाची टिकली ? लोक काय म्हणतील ?

लोकांचं काय घेऊन बसलीस आम्हाला तुला ह्याच रूपात पाह्यला आवडेल.
बारावीत शिकणाऱ्या मुलाच्या अशा खंबीर बोलण्याने ती पुरती भारावून गेली तिने तिन्ही लेकरांना छातीशी कवटाळले, तिच्या डोळ्यात आनंदाश्रू होते.